म्हणून आम्ही Engineer होतो ! Engineering ला घेतो आम्ही admission आनंदाने, करतो पूर्ण complete खूप कष्टाने. ते Submission,तो Syllabus हे सगळं एका रात्रीतचं Complete करतो, अक्षरशः डोळ्यांतली झोप आम्ही उडवून टाकतो. आमचे Viva चे उत्तरं ऐकून Externals सुद्धा डोळ्यांत डोळे घालून बघतात, केलस काय बाबा पूर्ण Sem हा टोमणा ते नक्की मारतात. पेपर आल्यावर आम्ही अभ्यास थोडासाचं करतो, पण Backlog नाही लागणार याची काळजी मात्र नक्की घेतो. म्हणून आम्ही Engineer होतो ! या चार वर्षांत करतो आम्ही खूप मौज, कारण आगाऊपणा करण्याची असते न खूप हौस. नातेवाईकांचे टोमणे तर खूप ऐकून घेतो, पण एकवेळचे Set झाल्यावर त्यांचे तोंड नक्की बंद करतो. म्हणून आम्ही Engineer होतो ! - तेजस संजय पाटील