Skip to main content

म्हणून आम्ही इंजिनिअर होतो - कविता

म्हणून आम्ही Engineer होतो !

Engineering ला घेतो आम्ही admission आनंदाने,
करतो पूर्ण complete खूप कष्टाने.

ते Submission,तो Syllabus हे सगळं एका रात्रीतचं Complete करतो,
अक्षरशः डोळ्यांतली झोप आम्ही उडवून टाकतो.

आमचे Viva चे उत्तरं ऐकून Externals सुद्धा डोळ्यांत डोळे घालून बघतात,
केलस काय बाबा पूर्ण Sem हा टोमणा ते नक्की मारतात.

पेपर आल्यावर आम्ही अभ्यास थोडासाचं करतो,
पण Backlog नाही लागणार याची काळजी मात्र नक्की घेतो.
म्हणून आम्ही Engineer होतो !

या चार वर्षांत करतो आम्ही खूप मौज,
कारण आगाऊपणा करण्याची असते न खूप हौस.

नातेवाईकांचे टोमणे तर खूप ऐकून घेतो,
पण एकवेळचे Set  झाल्यावर त्यांचे तोंड नक्की बंद करतो.

म्हणून आम्ही Engineer होतो !

- तेजस संजय पाटील
    

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी-कविता

माझी मराठी. मराठी! माझी मातृभाषा मराठी, स्वराज्याच्या माझी राजभाषा मराठी. छत्रपती लाभले प्रिय मराठीला, प्राचीन इतिहास आहे या पावन भूमीला. संतांनी जाणली माझी मराठी, पवित्र ग्रंथ लिहूनी वाढविल्यात माणूसकीच्या गाठी. नावलौकिक अशी प्राचीन मराठी, समृद्ध, प्रेमळ माझी मराठी. अभंग, कीर्तने, भजन, पोवाडा, आरती, अश्या अनेकांमुळे प्रचलित माझी मराठी. मंत्रमुग्ध होवूनी, मनी धैर्य वाढवती, जणू अमृताची गोळी माझी मराठी. जगतो मराठी, ऐकतो मराठी, सर्वश्रेष्ठ माझी मराठी !! -तेजस संजय पाटील.

शिस्त- कविता

शिस्त कुणाची आवडती... कुणाची नावडती... ती म्हणजे शिस्त... कुणात असते... कुणात नसते... तर कुणाकुणाला असून... नसल्यासारखी असते... ती म्हणजे शिस्त... आई-वडील लावतात शिस्त,... पण मुलंच असतात बेशिस्त... म्हणूनच असून नसल्यासारखी असते... ती म्हणजे शिस्त... जीवनाची घडण असते त्यात... त्यामुळेच लोक ओळखतात... त्यातूनच मुलं चांगली घडतात... ती म्हणजे शिस्त... माझं म्हणणं एकच... शिस्तीने राहायचं... शिस्तीने जगायचं... शिस्तीनेच लोकांचे... ह्रदय जिंकूनजिंकायच...

सिव्हिल इंजिनिअर!

जेव्हा Civil Engineer कविता लिहितो, प्लॉट आहे २००० स्क्वेअर फूट माझा, Boundary काढायचा खडू तू बनशील का? राख आणि मातीपासून विट मी बनवेल, भाजून त्यांना Strength तू वाढवशील का? Cement आणि वाळू आणेल मी दुकानातून, काँक्रीट त्यांचं बनऊन देशील का? Tiles तर मी लाऊन घेईल,  त्यावर झाडू तू मारशील का? प्रेम करतेस जसं तू तुझ्या घरच्यांवर,  तसं माझ्या आई वडिलांना सांभाळून घेशील का? ऐक ना गं सखे, प्रेमात तू माझ्या पडशील का? -तेजस संजय पाटील