Skip to main content

Posts

Showing posts from December, 2024

आयुष्य-कविता

भाग्य होतं म्हणून जन्म मनुष्याचा घेऊन आलो, आई-वडिलांच्या आशीर्वादाने लवकरचं मोठा होऊन गेलो. लहानपण जणू लवकरचं निघून गेलं, होत गेल्या चुका,शिकून त्यातून समजदार होता आलं. उतरलो या मोठ्या स्पर्धायुक्त जगात, येईल का मला यश ही भीती होती मनात. छोट्या गावामधून मोठ्या शहरात आलो, स्वतःच्या इच्छेला वाव देण्यासाठी इंजिनियर बनून गेलो. वयाची २०वी लवकरचं येऊन गेली, मोठं होऊन पैसे कमवायची जाण होऊ लागली. लोकांची मने जिंकून घ्यायची मनाला लागली आस, आयुष्यात मोठी स्वप्न साकारेल आहे स्वतःवर विश्वास. - तेजस संजय पाटील.

वाटतंय मनाला-कविता

वाटतंय मनाला. वाटतंय मनाला काही तरी व्हायचय... स्वतःच्या पायावर लवकर उभं रहायचं... वाटतंय मनाला अधिकारी व्हायचंय... प्रत्येकाच्या अडचणी लवकर दूर कारायचंय... वाटतंय मनाला इंजिनीअर व्हायचंय... जीवन जगतांना मौज करायचीय... वाटतंय मनाला सुखी खूप व्हायचंय... पण येतो मला प्रश्न दुःखी कधी राहायचं?... वाटतंय मनाला श्रीमंत व्हायचंय... परंतु श्रीमंत होऊन गर्विष्ठ नाही व्हायचंय... वाटतंय मनाला खुप खुप शिकायचंय... त्यासोबतच संस्काराच रोप लावचय... वाटतंय मनाला वाघासरखं जगायचंय... दहशतीखाली कुणाच्या नाही राहायचं... वाटतंय मनाला केवळ समाधानी राहायचं... मान-सन्मानानं जीवन जगायचंय...                                   😊-

बाबा-कविता

अहो बाबा,तुम्ही घालतात फाटकी बनेन,आणतात मला कोट,  अरे कुणाला माहीत हे बापाचा कष्ट किती ती मोठं! तुम्ही करतात माझ्या सर्व इच्छा पूर्ण, कोणतेच येऊ कही देत नाही विघ्न. बहिणीला जे लागलं ते देतात, आईच्या सर्व हौस पुर्ण करतात, पण स्वतःवर काही लक्ष नाही ठेवता. घरात कुणी आजारी पडलं कि तर त्याचा दवाखाना पूर्ण करतात, पण स्वतःला कितीही तापं आला तरी तसेच झोपून राहतात. जवळ पैसा नसला तरी आणतात इकडन-तिकडनं, अहो बाबा तुम्ही का नसतात सांगत मला खरं कारण?  स्वतःची चप्पल फाटलेली असली तरी मला म्हणतात नवीन चप्पल घेऊ ना कधीतरी.  जन्माला आणलय मला तुम्ही तुमच्या पोटी, बाबा मी आपल्यात कधीच पडू देणार नाही गाठी. बाबा, तुम्ही ना मला फार जास्त आवडतात .  -तेजस संजय पाटील

आई-कविता

आई तु मला खुप खूप आवडते. सहन केलंस तु दुखणं माझ नऊ महिने सारं, तुला दाखवेल मी संपुर्ण सुख न्यारं. केलसं तु मला लहानचं मोठं खूप थाटात,  नाव कमवेल तुझ मी खुप वेगळ्या स्वरुपात. पुरेशी चपाती नसली तरी तु घेतेस खाऊन त्यातला घास,  मला एक चपाती देण्यासाठी का सहन करतेस हा त्रास? राब-राब राबते दुसऱ्यांसाठी, विचार केलास का तू स्वतःचा कधी? तु जगतेय आम्हा सर्वांसाठी, कधी जगणार गं तु स्वतःसाठी, स्वतःसाठी? आई गं तु ना खरचं मला खूप खूप आवडती. -तेजस संजय पाटील