अहो बाबा,तुम्ही
घालतात फाटकी बनेन,आणतात मला कोट,
अरे कुणाला माहीत हे बापाचा कष्ट किती ती मोठं!
तुम्ही करतात माझ्या सर्व इच्छा पूर्ण, कोणतेच येऊ कही देत नाही विघ्न.
बहिणीला जे लागलं ते देतात,
आईच्या सर्व हौस पुर्ण करतात,
पण स्वतःवर काही लक्ष नाही ठेवता.
घरात कुणी आजारी पडलं कि तर त्याचा दवाखाना पूर्ण करतात,
पण स्वतःला कितीही तापं आला तरी तसेच झोपून राहतात.
जवळ पैसा नसला तरी आणतात इकडन-तिकडनं,
अहो बाबा तुम्ही का नसतात सांगत मला खरं कारण?
स्वतःची चप्पल फाटलेली असली तरी मला म्हणतात नवीन चप्पल घेऊ ना कधीतरी.
जन्माला आणलय मला तुम्ही तुमच्या पोटी,
बाबा मी आपल्यात कधीच पडू देणार नाही गाठी.
बाबा, तुम्ही ना मला फार जास्त आवडतात.
-तेजस संजय पाटील
Comments
Post a Comment