आई तु मला खुप खूप आवडते.
सहन केलंस तु दुखणं माझ नऊ महिने सारं,
तुला दाखवेल मी संपुर्ण सुख न्यारं.
केलसं तु मला लहानचं मोठं खूप थाटात,
नाव कमवेल तुझ मी खुप वेगळ्या स्वरुपात.
पुरेशी चपाती नसली तरी तु घेतेस खाऊन त्यातला घास,
मला एक चपाती देण्यासाठी का सहन करतेस हा त्रास?
राब-राब राबते दुसऱ्यांसाठी,
विचार केलास का तू स्वतःचा कधी?
तु जगतेय आम्हा सर्वांसाठी,
कधी जगणार गं तु स्वतःसाठी, स्वतःसाठी?
आई गं तु ना खरचं मला खूप खूप आवडती.
-तेजस संजय पाटील
Comments
Post a Comment