Skip to main content

Posts

Showing posts from 2025

अवकाळी पाऊस- कविता

उन्हाचे चटके जरा कमी जाणवले, थंड हवेचे वारे वाहू लागले! जून चा पाऊस मे मध्येच आला,  ओलं करून सगळ्यांना जोरात निघून गेला! तहानलेली भूमी मात्र सुगंधित झाली,  झाडांची जणू अंघोळ होऊ लागली! सरबतचा ट्रेंड कमी झाला थेट,  चहाने दिला थंडपेयाला चेकमेट!   गावामधील नाली जोरात धाऊ लागली,  शहरातली ड्रेनेज मात्र लगेच ब्लॉक झाली! झालंय जरा नुकसान माझ्या बळीराजाला, विश्वास आहे आम्हा आहे देव सोबतीला,  आहे देव सोबतीला! जुन चा पाऊस मे मध्येच आला, ओलं करून सगळ्यांना जोरात निघून गेला! -तेजस संजय पाटील.

माझी मराठी-कविता

माझी मराठी. मराठी! माझी मातृभाषा मराठी, स्वराज्याच्या माझी राजभाषा मराठी. छत्रपती लाभले प्रिय मराठीला, प्राचीन इतिहास आहे या पावन भूमीला. संतांनी जाणली माझी मराठी, पवित्र ग्रंथ लिहूनी वाढविल्यात माणूसकीच्या गाठी. नावलौकिक अशी प्राचीन मराठी, समृद्ध, प्रेमळ माझी मराठी. अभंग, कीर्तने, भजन, पोवाडा, आरती, अश्या अनेकांमुळे प्रचलित माझी मराठी. मंत्रमुग्ध होवूनी, मनी धैर्य वाढवती, जणू अमृताची गोळी माझी मराठी. जगतो मराठी, ऐकतो मराठी, सर्वश्रेष्ठ माझी मराठी !! -तेजस संजय पाटील.

सिव्हिल इंजिनिअर!

जेव्हा Civil Engineer कविता लिहितो, प्लॉट आहे २००० स्क्वेअर फूट माझा, Boundary काढायचा खडू तू बनशील का? राख आणि मातीपासून विट मी बनवेल, भाजून त्यांना Strength तू वाढवशील का? Cement आणि वाळू आणेल मी दुकानातून, काँक्रीट त्यांचं बनऊन देशील का? Tiles तर मी लाऊन घेईल,  त्यावर झाडू तू मारशील का? प्रेम करतेस जसं तू तुझ्या घरच्यांवर,  तसं माझ्या आई वडिलांना सांभाळून घेशील का? ऐक ना गं सखे, प्रेमात तू माझ्या पडशील का? -तेजस संजय पाटील