उन्हाचे चटके जरा कमी जाणवले,
थंड हवेचे वारे वाहू लागले!
जून चा पाऊस मे मध्येच आला,
ओलं करून सगळ्यांना जोरात निघून गेला!
तहानलेली भूमी मात्र सुगंधित झाली,
झाडांची जणू अंघोळ होऊ लागली!
सरबतचा ट्रेंड कमी झाला थेट,
चहाने दिला थंडपेयाला चेकमेट!
गावामधील नाली जोरात धाऊ लागली,
शहरातली ड्रेनेज मात्र लगेच ब्लॉक झाली!
झालंय जरा नुकसान माझ्या बळीराजाला,
विश्वास आहे आम्हा आहे देव सोबतीला,
आहे देव सोबतीला!
जुन चा पाऊस मे मध्येच आला,
ओलं करून सगळ्यांना जोरात निघून गेला!
-तेजस संजय पाटील.
Comments
Post a Comment