जेव्हा Civil Engineer कविता लिहितो,
प्लॉट आहे २००० स्क्वेअर फूट माझा, Boundary काढायचा खडू तू बनशील का?
राख आणि मातीपासून विट मी बनवेल,
भाजून त्यांना Strength तू वाढवशील का?
Cement आणि वाळू आणेल मी दुकानातून, काँक्रीट त्यांचं बनऊन देशील का?
Tiles तर मी लाऊन घेईल,
त्यावर झाडू तू मारशील का?
प्रेम करतेस जसं तू तुझ्या घरच्यांवर,
तसं माझ्या आई वडिलांना सांभाळून घेशील का?
ऐक ना गं सखे,
प्रेमात तू माझ्या पडशील का?
-तेजस संजय पाटील
Comments
Post a Comment