माझी मराठी.
मराठी! माझी मातृभाषा मराठी,
स्वराज्याच्या माझी राजभाषा मराठी.
छत्रपती लाभले प्रिय मराठीला,
प्राचीन इतिहास आहे या पावन भूमीला.
संतांनी जाणली माझी मराठी,
पवित्र ग्रंथ लिहूनी वाढविल्यात माणूसकीच्या गाठी.
नावलौकिक अशी प्राचीन मराठी,
समृद्ध, प्रेमळ माझी मराठी.
अभंग, कीर्तने, भजन, पोवाडा, आरती,
अश्या अनेकांमुळे प्रचलित माझी मराठी.
मंत्रमुग्ध होवूनी, मनी धैर्य वाढवती,
जणू अमृताची गोळी माझी मराठी.
जगतो मराठी, ऐकतो मराठी,
सर्वश्रेष्ठ माझी मराठी !!
-तेजस संजय पाटील.
Comments
Post a Comment